शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 29 जुलै 2019 (16:17 IST)

एका आठवड्यात पूर्ण होत ब्राह्ममुहूर्तात बघितलेले स्वप्न

ज्योतिष शास्त्रात गाढ झोपेत बघितलेले स्वप्न बरेच काही सांगून जातात. असे स्वप्न भविष्यात अफाट धन मिळण्याची सूचना देतात. काही स्वप्न यात दुःखद देखील असू शकतात. जर स्वप्न ब्राह्ममुहूर्तात बघितले असेल तर ते एका आठवड्यात नक्कीच पूर्ण होतात पण या आधीच्या स्वप्नांचे फळ मिळण्यासाठी किमान एक महिना लागतो. जेव्हा की अर्ध्या रात्री बघितलेले स्वप्न फारच कमी पूर्ण होतात.  
 
आपल्या बाळाला चालताना बघणे किंवा फळाची गुठली (कर्नल) बघणे लवकर धन मिळण्याचे संकेत आहे. जर स्वप्नात स्त्री एखाद्या पुरुषासोबत किंवा पुरुष एखाद्या स्त्री सोबत संभोग करताना दिसेल तर लवकरच धनलाभ होण्याचे संकेत आहे. ज्योतिषिनुसार अशा लोकांना येणार्‍या काळात लॉटरी देखील लागू शकते.  
 
सकाळच्या वेळेस दरी (खंदक) बघितल्याने धनहानी होण्याची शक्यता असते. आकाशात वीज कोसळताना बघितले तर व्यापारात फार मोठा धनलाभ होण्याचा संकेत आहे.  याच प्रकारे जर एखाद्या मुलीचे विदाई समारोह दिसेल किंवा मास दिसले किंवा स्वत:ला हातमोजे घातलेले दिसले तर लवकरच करोडपती बनण्याचा योग असतो. शेतात गव्हाचे पीक पिकताना दिसेल तर सौभाग्यात वाढ होते. जर स्वप्नात कोणाला धन उधार दिले किंवा आगपेटी जळताना दिसेल तर धनप्राप्ती होते. याच प्रकारे हिरवेगार जंगल किंवा फुलांनी भरलेली क्यारी देखील शुभ मानली जाते. स्वप्नात एखाद्या दाराला बंद होताना बघणे किंवा कोणी तुमच्या खोलीतून बाहेर निघून दार बंद करताना दिसेल तर समजून घ्या की तुमच्याजवळ लवकरच धन येणार आहे. स्वप्नात खच्चर दिसणे म्हणजे धनहानी होण्याचा योग असतो जेव्हा की लहान जोडे घालणे किंवा असे स्वप्न बघणे की तुमच्या पायात जोडा येत नाही तर एखाद्या स्त्रीशी भांडण होऊन आर्थिक नुकसानीचे संकेत आहे.