बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 फेब्रुवारी 2020 (16:16 IST)

अर्जुन गेला ब्लाइंड डेटवर

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सध्या हे बी टाऊनमधील सर्वाधिक लोकप्रिय कपल आहे. पण आता अर्जुन चर्चेत आहे ते खास व्यक्तीसोबतच त्याच्या ब्लाइंड डेटमुळे. नुकताच अर्जुन ब्लाइंड डेटवर गेला होता. पण ती व्यक्ती मलायका अरोरा नव्हती. निर्माता करण जोहर लवकरच नेटफ्लिक्सवर एक नवा शो आणत आहे. hat the Love असे या शोचे नाव आहे. या शोमध्ये अर्जुन कपूर कन्टेस्टंट आशीसोबत ब्लाइंड डेटवर गेला होता.
 
याचा व्हिडिओ अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, थहरीं What the Love चे बिहाइंड द सीन्स. ही माझी पहिली ब्लाइंड डेट होती. पण हा खूपच सुंदर अनुभव होता. हा शो नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला आहे. या व्हिडिओमध्ये आशीसोबत अर्जुन कपूर खूपच कम्फर्टेबल दिसत आहे. दोघेही एकत्र खूप एन्जॉय करताना दिसत आहे. एकमेकांशी गप्पा मारत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हारल होत असून अर्जुनच्या चाहतंच्या पसंतीस उतरला आहे. अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास त्याच्या शेवटचा 'पानिपत' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारिकर यांनी केले होते. यात अर्जुनसोबतच संजय दत्त आणि कृती सेनन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.