रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (12:46 IST)

बाहुबली सोबत नव्हे तर भारतीय क्रिकेटपटूशी लग्न करणार अनुष्का शेट्टी

सुपरहिट सिनेमा बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिचं नाव सुरुवातीला बाहुबलीच्या को स्टार प्रभास सोबत जोडण्यात आलं होतं. तेव्हा कॉफी विद करण या शोमध्ये प्रभासने असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले होते. 
 
पण मीडिया रिपोर्टनुसार आता बाहुबलीची देवसेना म्हणजेच अनुष्का एका नावाजलेल्या भारतीय क्रिकेटपटूला डेट करत आहे. एवढंच नाही तर दोघं लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे हा क्रिकेटपटू दक्षिणेतील नसून उत्तरेकडील असल्याचं म्हटलं जात आहे. आतापर्यंत त्याच्या नावाचा खुलासा झाला नसला तरी लवकरच हे अफेयर लग्नावर येऊन थांबणार अशी माहिती दिली जात आहे.
 
सध्या अनुष्का तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती लवकरच निशब्धम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत आर. माधवन दिसणार आहे. सिनेमात अनुष्काने एका मूक कलाकाराची भूमिका साकारली आहे.