सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (08:32 IST)

अभिनेत्री तेजश्री प्रधानचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

झी मराठीवरील 'अग्गबाई सासूबाई' मालिकेतील शुभ्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या शुभ्रा या खास भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. तेजश्री आगामी 'बबलू बॅचरल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तेजश्रीने नुकतंच सोशल मीडियावर 'बबलू बॅचरल'चं पोस्टर शेअर केलं आहे. येत्या २० मार्च रोजी 'बबलू बॅचरल' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 
 
'बबलू बॅचरल'मध्ये तेजश्री प्रधान, अभिनेता शर्मन जोशीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटापूर्वी तेजश्री आणि शर्मन या दोघांनी हिंदी नाटकात एकत्र काम केलं आहे. अग्निदेव चटर्जी यांनी 'बबलू बॅचरल' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.