रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 23 फेब्रुवारी 2020 (17:44 IST)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जेवण्यासाठी सोन्याचे ताट...

अमेरिके चे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प उद्यापासून दोन दिवसीय भारताच्या दौऱ्यावर येत असून गुजरातच्या अहमदाबाद आणि दिल्ली येथे जय्यत तयारी सुरु झाली आहे.
 
जयपूरच्या अरुण पाबुवाल यांनी ट्रम्प कुटुंबियांसाठी खास सोन्या-चांदीच्या मुलामाची क्रॉकरी तयार केली आहे. अशी माहिती अरुण पाबुवाल यांनी दिली आहे.
 
ट्रम्प यांना त्याच ताटात जेवण दिले जाणार आहे.या क्रॉकरीमध्ये कपसेटआणि ड्रायफूटसाठीच्या कटलरीचा समावेश देखील आहे.      
 
35 जणांनी मिळून ही क्रॉकरी तयार केली आहे. जवळपास तीन आठवड्यात ही क्रॉकरी तयार केल्याचे पाबुवाल यांनी सांगितले.