बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

घटस्फोटित व्यक्तीशी लग्न करणार अनुष्का शेट्टी?

गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी चर्चेत आहे. ती उत्तर भारतीय क्रिकेटपटूला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. पण या सर्व अफवा असल्याचे म्हणत अनुष्काने चर्चांना पूर्ण विराम लावला. आता 'देवसेने'चे नाव एका दिग्दर्शकाशी जोडण्यात आले आहे. या दिग्दर्शकाचे नाव प्रकाश कोवेलुडी असल्याचे म्हटले जात आहे. वृत्तानुसार येत्या काही दिवसांमध्ये अनुष्का दिग्दर्शक प्रकाश कोवेलुडीशी लग्न करणार आहे. मात्र अनुष्काने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. प्रकाश हा -दिग्दर्शक के राघवेंद्र राव यांचा मुलगा आहे. 
 
त्याने अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणूनदेखील काम  केले आहे. 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. प्रकाशने 2017 मध्ये कनिका ढिल्लोंला घटस्फोट दिला आणि आता तो अनुष्काला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.