मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

कोरोना विषाणूमुळे देशात दुसरा मृत्यू, 69 वर्षीय महिलेचा दिल्लीत मृत्यू

कोरोना विषाणूमुळे भारतात मृत्यूची दुसरी घटना समोर आली आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या दिल्लीत एका 69 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालय आणि दिल्ली सरकारच्या अधिकार्‍यांनी ही माहिती दिली. अधिकार्‍यांनी सांगितले की एकापेक्षा जास्त आजारांमुळे (मधुमेह आणि उच्च रक्तदाब) महिलेचा मृत्यू झाला. तथापि,  तिला कोरोना विषाणूची लागण होण्याचीही पुष्टी झाली आहे. त्यांनी सांगितले की महिलेला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

देशातील या संसर्गामुळे मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. कर्नाटकच्या कलबुर्गी येथे या आजाराने 76 वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी मृत्यू झाला परंतु गुरुवारी कोरोना विषाणूची लागण झाल्याची खात्री पटली.
दुसरीकडे, पश्चिम दिल्लीतील जनकपुरी येथील रहिवासी आणि नोएडा येथे काम करणार्‍या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 773 जणांचा शोध लागला आहे. या संदर्भात, सर्व खबरदारीच्या सूचना विहित प्रोटोकॉल / मार्गदर्शक तत्त्वांच्या अंतर्गत घेतल्या जात आहेत.