शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मार्च 2020 (10:40 IST)

भारतात करोनाचा पहिला बळी, सौदी अरेबियातून आलेल्या रुग्णाचा कर्नाटकात मृत्यू

करोना व्हायरसने भारतात आपला पहिला बळी घेतला आहे. कलबुर्गी येथील एका ७६ वर्षीय रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी ही माहिती दिली. 
 
मोहम्मद हुसेन सिद्दीकी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ते सौदी अरेबियातून आले होते. त्यांच्या संपर्कात जवळपास 43 जण आले होते. आता या 43 जणांचा शोध घेण्यात येतोय.
 
सिद्दीकी यांच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तेलंगणमधील एका रुग्णालयात उपचारसाठी ते दाखल झाले होते. 
 
देशातील 7 राज्यांमध्ये करोनाचे 16 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे करोनाच्या रुग्णांची संख्या 76 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, लडाख, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात करोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.