मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मार्च 2020 (14:24 IST)

आमच्याकडे कुणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही

विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना उत्तर देत म्हटले की आमच्याकडे कुणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच असं सांगत भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा दिला होता. 
 
त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी चिमटा घेतला की ”आमच्याकडे कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तुमच्याकडे होणार नाही याकडे लक्ष ठेवा. बरेच जण गैरहजर आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवा.”