गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 मार्च 2020 (10:38 IST)

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल, रामदास आठवलेंचा दावा

BJP-Shivsena government
मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप येऊ शकतं असे भाकित अनेकांनी केलं असलं तरी राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
 
आठवले म्हणाले की उद्धव ठाकरे महाविकासआघाडीत नाराज असून ते परत येतील आणि परत आले नाहीत तरी त्यांचे आमदार भाजपात येतील. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देत आहेत असा आरोप यावेळी त्यांनी केला.
 
मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींवर बोलताना रामदास आठवले यांनी म्हटलं की मध्य प्रदेशाप्रमाणे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही बदल होतील.
 
त्यांनी म्हटले की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे उद्धव ठाकरेंना निर्णय घेताना अडचणी येत आहेत. म्हणून महाराष्ट्रातही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येऊ शकतं”.