शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 मार्च 2020 (18:38 IST)

मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्र, Maharashtra ट्विटवर ट्रेंडमध्ये

काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसविरोधात बंड पुकारल्यानं मध्य प्रदेशातील सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची चिन्हं आहेत. मध्य प्रदेशात आलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे महाराष्ट्रात बसण्याची शक्यता आहे. ट्विटवर मात्र महाराष्ट्राची चर्चा आहे. 
 
Maharashtra ट्विटवर काही काळ टॉप ट्रेण्ड होत होता. मध्य प्रदेशात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी होत असल्याचं दिसताच महाराष्ट्रातील भाजप समर्थकांना हुरूप आला. आता भाजप आपला मोर्चा महाराष्ट्राकडं वळवणार, असे अंदाज व्यक्त होऊ लागले. मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्रात संत्तांतर घडण्याची शक्यता अशा विषयांवर शेकडो ट्विटस करण्यात आले आहेत.
 
महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही या तिन्ही पक्षांनी त्याला सत्तेपासून दूर ठेवलं आहे. या सत्तांतरानंतर याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार का, ऑपरेशन लोटसराबवलं जाईल का हे येणारा काळच सांगेल.