शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 9 मार्च 2020 (17:16 IST)

संजय राऊत यांनी शरद पवार यांची घेतली भेट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होत आहे. पवार साहेबांची आणि माझी भेट नेहमीच होत असते. वेगळं काही नाही, पवार साहेबांना, सुप्रियाताईंना मी नेहमी भेटत असतो, अशी पुष्टीही संजय राऊतांनी जोडली. 
 
त्याबाबत संजय राऊत म्हणाले, “ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागा लढणार आहे. राज्यसभेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची जास्त मतं आहेत. काँग्रेसचीही मतं आहेत, त्यामुळे सातवी जागा आम्ही जिंकू शकतो आणि त्या जागेसंदर्भात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यानुसार ती जागा यावेळेला राष्ट्रवादीकडे आहे. त्या जागेवर फौजिया खान यांची उमेदवारी पवार साहेबांनी जाहीर केली आहे”