शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अहमदनगर , सोमवार, 9 मार्च 2020 (16:34 IST)

अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन एप्रिलमध्ये

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन येत्या 30 एप्रिल रोजी करण्याचा विचार आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली. येत्या 4 एप्रिल रोजी अयोध्येत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक होणार असून त्यावेळी भूमिपूजनाबाबतचा निर्णय होणार घेण्यात येणार आहे. मात्र, 30 एप्रिल रोजीच भूमिपूजन सोहळा पार पडेल, अशी आजची स्थिती आहे, असेही स्वामी म्हणाले. श्रीराम मंदिराचे भूमिपूजन पूर्णपणे वैदिक पद्धतीने होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असेही स्वामींनी सांगितले.
 
श्रीराम जन्मभूमी मंदिराचा सध्याचा जो आराखडा आहे, तो 90 ट्रके स्वीकारला गेला आहे. त्यात अजून मंदिराची भव्यता करण्याचे नियोजन आहे. तीन वर्षात मंदिर उभारणीचे लक्ष्य आहे. यासाठी निधी संकलन लवकरच सुरू होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अयोध्या शाखेमध्ये मंदिर न्यासाचे खाते उघडल्यानंतर निधी संकलन सुरू होईल.अयोध्येतील राममंदिर पूर्णपणे पाषाणात होणार असून भारतीय संस्कृतीचे संस्कार केंद्र व विश्व संस्कार राजधानी म्हणून या निमित्ताने अयोध्येचा विकास करण्याचे मंदिर न्यास समितीचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले.