रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 9 मार्च 2020 (14:38 IST)

राणा कपूर यांनी प्रियांका गांधींच्या पेंटिंगसाठी मोजले दोन कोटी

येसबँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पेंटिंग दोन कोटी रुपयांना खरेदी केले होते, अशी माहिती आता पुढे आली असून यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाक्‌युद्ध रंगले आहे.

भाजपने काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यासोबत राणा कपूर यांचे फोटो दाखवून काँग्रेसला लक्ष्य केले होते. त्यातच प्रियांका गांधी यांचे पेंटिंग राणा कपूर यांनी खरेदी केल्याची माहिती हाती लागली आहे. यूपीए सरकारच्या काळात राणा कपूर यांनी 2 कोटी रुपयांना हे पेंटिंग खरेदी केले होते, अशी खात्रीशीर माहिती असून आयटी विभागाने याची चौकशी सुरू केली आहे.
 
राणा कपूर यांनी प्रियांका गांधींचे पेंटिंग विकत घेतले होते, हे काँग्रेसने मान्य केले आहे. प्रियांका गांधी यांनी त्यांचे पेंटिंग विकले आणि ते कुणीतरी खरेदी केले, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. एखादी वस्तू विकताना ती कोणी खरेदी केली हे पाहिले जात नाही. जो पैसा देतो तो वस्तू विकत घेतो, इतक्यापुरताच हा व्यवहार आहे. जर नरेंद्र मोदींनी हे पेंटिंग खरेदी केले असते तर तुम्ही कायम्हणाला असता?