मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified शनिवार, 25 जानेवारी 2020 (14:00 IST)

आधार, पॅन कार्डची माहिती कंपन्यांना द्या अन्यथा अन्याथा टीडीएसपोटी वेतनातून 20 टक्के रक्कम कापली जाईल

प्रतिवर्षी जर तुम्हाला अडीच लाख रुपये वेतन मिळत असेल, आणि तुम्ही तुमच्या पॅनकार्ड, आधार कार्डाची माहिती मालकाला दिली नसेल तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. आधार, पॅन कार्डची माहिती न देणार्‍या कर्मचार्‍यांच्या वेतनातून टीडीएसपोटी 20 टक्के रक्कम कापण्याचे निर्देश आयकर खात्याने कंपन्यांना आहेत. 
 
केंद्रीय थेट कर मंडळाने (सीबीडीटी) हा नियम बनवला असून, 16 जानेवारीपासून अंमलात येण्यास सुरुवात झाली आहे. प्रतिवर्षी अडीच लाख किंवा त्यापेक्षा जास्त वेतन घेणार्‍यांना हा नियम लागू होणार आहे. टीडीएस रचनेतून भरला जाणारा कर आणि किती महसूल गोळा होतो त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा नियम बनवण्यात आला आहे. 
 
2018-19 या आर्थिक वर्षात डायरेक्ट टॅक्सच्या तुलनेत टीडीएसमधून 37 टक्के महसूल जमा झाला. इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 206 अअ नुसार कर्मचार्‍यांना पॅनकार्ड आणि आधार कार्डाची माहिती देणे बंधनकारक आहे असे सीबीडीटीच्या 86 पानी परिपत्रकात म्हटले आहे.