कमलनाथ यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, राज्यपालांकडे मागितली भेटीची वेळ

kamal nath
भोपाळ| Last Updated: शुक्रवार, 20 मार्च 2020 (12:49 IST)मध्ये प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे. कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर आरोप करत राजीनामा देत असल्याची यांची माहिती दिली.
भाजपकडे १५ वर्षे होती, मला फक्त १५ महिने मिळाले. मात्र १५ महिन्यात भरपूर विकास करण्याचा प्रयत्न केला. जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलं, त्यामुळेच भाजपला हे सहन झालं नाही. त्यामुळे भाजपनं काँग्रेसचे आमदार फोडले, असा घणाघात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला. आज त्यांनी काँग्रसने केलेल्या विकासकामांचा पाढाच वाचला, त्यावेळी त्यांना भाजपवर शरसंधानही साधलं. दरम्यान, कमलनाथ यांनी राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली आहे.

मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी आज घेण्याचे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे बहुमत चाचणीच्या अग्निपरिक्षेतून कमलनाथ सरकार तरणार की जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गुरुवारी सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, शुक्रवारी सकाळी विधानसभेचे सत्र आयोजित करून सायंकाळी 5 वाजेपर्यंत कमलनाथ सरकारने बहुमत चाचणी घ्यावी. बहुमत चाचणीवेळी हात उंचावून मतदान घेतले जाईल. सभागृहात पार पडणार्‍या या कारवाईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. कॉँग्रेसच्या कर्नाटकात असणार्‍या 16 आमदारांना जर या बहुमत चाचणीत सहभागी व्हायचे असेल तर त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करून भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी अल्पमतात असलेले हे सरकार कोसळणार असल्याची टीका केली.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाऊन दरम्यान हैद्राबादमध्ये बंद दुकानातून 70 हजारांची ...

लॉकडाऊन दरम्यान हैद्राबादमध्ये बंद दुकानातून 70 हजारांची दारु चोरी
हैद्राबादमधील गांधीनगर परिसरात लॉकडाऊन दरम्यान बंद दारुचे दुकान चोरट्यांनी फोडून 70 हजार ...

करोना: 30 जूनपर्यंत च्युइंगम चघळण्यावर बंदी

करोना: 30 जूनपर्यंत च्युइंगम चघळण्यावर बंदी
करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हरयाणा या राज्यात 30 जूनपर्यंत च्युइंगम चघळण्यावर बंदी ...

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल
निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली. या कार्यक्रमाने तर अनेकांना ...

लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे मोठे विधान, 14 एप्रिलपासून ...

लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे मोठे विधान, 14 एप्रिलपासून वाढविण्याची कोणतीही योजना नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन लागू ...

देशात ‘लॉकडाऊन’ ! NEET, JEE च्या परीक्षा लांबणीवर

देशात ‘लॉकडाऊन’ ! NEET, JEE च्या परीक्षा लांबणीवर
देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा NEET अखेर ...