शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 14 मार्च 2020 (09:54 IST)

बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा

बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. त्यांना सामाजकार्यात स्वत:ला झोकून द्यायचं असल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलं. बिल गेट्स यांना जागतिक आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करायचं आहे, त्यामुळेच ते सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले आहेत. परंतु ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत.
 
“मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि तांत्रिक सल्लागार बिल गेट्स यांना आपला सर्वाधिक वेळ शिक्षण, आरोग्य आणि जागतिक विकासाला चालना देण्यासाठी द्यायचा आहे, यासाठीच ते कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा देत आहेत,” अशी माहिती मायक्रोसॉफ्टकडून देण्यात आली. १९७५ मध्ये पॉल अलेन यांच्यासोबत त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. २००० पर्यंत त्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडली होती.