शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , रविवार, 15 मार्च 2020 (16:16 IST)

उद्धव ठाकरे आणि पवारांमध्ये दोन तासांपासून चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली: सह्याद्री अतिथीगृहावर या दोघांमध्ये ही महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत अजित पवार, सुनिल तटकरे, जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित आहेत.
 
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक खबरदारीच्या गोष्टी केल्या जात आहेत. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकार करत असलेल्या कामाचीही माहिती दिली आहे. मात्र, जगभरात कोरोनावर नियंत्रणासाठी आरोग्यविषयक आणीबाणी घोषित केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
 
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “कोरोना व्हायरसच्या संसर्गाबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. दोघेही यावर अत्यंत गंभीर आहेत. आणखी काही चांगलं धोरण अवलंबता येईल का यावर त्यांनी चर्चा केली. ऐरोलीमध्ये संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्या व्यतिरिक्त सर्वत्र व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुका मागे पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.”