बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 3 मार्च 2020 (15:55 IST)

क्रिकेट सल्लागार समितीची आज बैठक

बीसीसीआयची क्रिकेट सल्लागार समिती आज (मंगळवारी) येथे आपली बैठक घेईल. ज्यामध्ये दोन राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू होईल. बीसीसीआयच्या नियमानुसार निवड समिती सदस्यांची निवड करण्याची जबाबदारी तीन सदस्यीय समितीची आहे. मात्र, 31 जानेवारीला नियुक्तीनंतर या समितीची कोणतीही बैठक झालेली नाही.
 
माजी भारतीय क्रिकेटर मदनलाल, आरपी सिंह आणि सुलक्षणा नाईक यांची समिती स्वानुभवासाठी त्या  सर्व संभाव्य नावांची निवड करतील ज्यांनी आपला अर्ज सिलेक्टर बनण्यासाठी पाठवला आहे. मात्र, निवड समितीच्या दोन रिकाम्या जागांसाठी निवड करण्यासाठी मुलाखतीची तारीखही अद्याप निश्चित केलेली नाही.
 
मदनलाल यांनी सोमवारी सांगितले की, ते बैठकीसाठी मुंबईला येत आहेत. ते म्हणाले हो मी बैठकीसाठी जात आहे. मात्र, आता माझ्याकडे कोणतीही सविस्तर माहिती नाही. बीसीसीआयच्या एका सूत्रानुसार या बैठकीचे आयोजन संभाव्य उमेदवारांच्या छाननीसाठीच करण्यात आले आहे. निवड समितीचे प्रमुख एएसके प्रसाद आणि त्यांचे साथीदार सदस्य गगन खोडा यांचा कार्यकाल संपला आहे व समिती या दोघांच्या जागेवरच नव्याने सदस्यांची निवड करणार आहे.
 
कोरोना व्हारसच्या धोक्यामुळे आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीस दुबईला न जाणारे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली मंगळवारी बीसीसीआयच्या मुख्यालयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर अजून काही दिवस वाट पाहिल्यानंतर हे स्पष्ट होईल की निवड समितीमध्ये दोन नवे चेहरे कोण असतील.