1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 मार्च 2020 (09:50 IST)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

mumbai pune express way
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर 1 मार्चच्या रात्री 11च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 3 दुचाकीस्वार लघुशंकेसाठी थांबले असताना भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने त्यांना उडवले. दरम्यान या अपघातामध्ये चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून एकाचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात अंडा पॉंईट येथील धोकादायक वळणावर असलेल्या दस्तुरी येथे झाला आहे. सध्या पोलिस टेम्पो चालकाचा शोध घेत आहेत. 
 
दरम्यान प्राप्त माहितीनुसार मयत दुचाकीस्वार हे तळेगाव दाभाडे येथील कामगार असून ते सुट्टी असल्याने अलिबागला फिरायले गेले होते. दरम्यान परतताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या तरूणांवर अचानक आलेल्या टेम्पोने धडक दिली. अपघातानंतर टेम्पोचा ड्रायव्हर फरार असून खंडाळा महामार्ग पोलिसांकडून त्याचा शोध घेत आहे.