बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (15:32 IST)

राजस्थानमध्ये लग्नाच्या वर्‍हाडाची बस नदीत कोसळली, 24 ठार

राजस्थानमध्ये लग्नाचं वऱ्हाड घेवून निघालेली एक बस नदीत कोसळल्याने 24 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. 
 
राजस्थानमधील बूंदी येथील कोटा लालसोट महामार्गावरुन जात असताना ही बस मेज नदीत कोसळली. या अपघातात 24 जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
 
घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आलं.