शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (10:21 IST)

राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी मतदान होणार असून निवडणूक आयोगाने  राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील ७ जागांसह देशभरातील एकूण ५५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 
 
देशातील १७ राज्यातून राज्यसभेवर निवडून आलेल्या ५५ सदस्यांची मुदत एप्रिल महिन्यात संपत आहे. यात महाराष्ट्रातील ७ सदस्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सदस्यांची मुदत २ एप्रिल २०२० रोजी संपुष्टात येत आहे. राज्यसभेसाठी खुले मतदान असल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.
 
विधानसभेत आघाडीचे १७० संख्याबळ
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केल्याने राजकीय समीकरण बदलले आहे. राज्यसभेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची ३७ मते आवश्यक आहेत. विधानसभेत आघाडीचे १७० तर भाजप आणि मित्र पक्षाचे ११४ असे संख्याबळ आहे. चार सदस्य तटस्थ आहेत. विधानसभेतील आघाडीचे आणि भाजपचे संख्याबळ लक्षात घेता आघाडीचे चार तर भाजपचे तीन उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात. परंतु, आघाडीतील तीन पक्षात अजून जागांचे वाटप झालेले नाही. तथापि, राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एक जागा लढू शकते.
 
राज्यसभेतून निवृत्त होणारे सदस्य
राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवार, माजिद मेमन
काँग्रेस : हुसेन दलवाई
शिवसेना : राजकुमार धूत
भाजप : अमर साबळे
आरपीआय : रामदास आठवले
अपक्ष : संजय काकडे