1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (13:42 IST)

उदयनराजे, आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी

Udayan Raje
उदयनराजे भोसले आणि रामदास आठवलेंना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी नश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहांची भेट घेतली. या भेटीत उदयनराजे भोसले आणि रामदास आठवलेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगणत येत आहे.
 
फडणवीस यांनी शहांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. तेथे नेत्यांमध्ये बैठक झाली. उदयनराजे भोसले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि धनंजय महाडिक या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. तसेच राज्यसभा  आणि विधानपरिषदेच्या जागांवरही चर्चा करण्यात आली. या चर्चेत उदयनराजे भोसले आणि रामदास आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे.