1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (10:25 IST)

काय म्हणता सर्वोच्च न्यायालयातील 6 न्यायाधीशांना स्वाईन फ्लू

swine flu
सर्वोच्च न्यायालयातील 6 न्यायाधीशांना स्वाईन फ्लू (एनच1एन1) ची लागण झाली आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी ही माहिती दिली. सुप्रीम कोर्टातील कोर्ट नंबर 2 मध्ये न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश एन. व्ही. रामन्ना आणि न्यायाधीश कृष्ण मुरारी यांनी तोंडावर मास्क लाऊन सुनावणी केली.  
   
न्या. चंद्रचूड म्हणाले की, सरन्यायाधीश शरद बोबडे यांना याबाबत योग्य ती पावले उचलण्याचा आग्रह केला गेला आहे. या आपत्कालीन स्थितीचा सामना करण्याबाबत चर्चा झाली आहे. न्यायाधीश आजारी पडल्याने सुनावणींवर परिणाम झाला आहे. सर्वच न्यायाधीशांनी सरन्यायाधीश बोबडेंची भेट घेऊन याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील सर्व वकील आणि कर्मचार्‍यांना लसीकरण केले जाणार असल्याची माहितीही न्या. चंद्रचूड यांनी दिली.  
 
दरम्यान, सर्व न्यायाधीशांना एच1एन1 ची लागण एकत्रितरीत्या झालेली नाही. सहापैकी 4 न्यायाधीशांनी उपचार घेतले असून ते पुन्हा कार्यरत झाले आहेत. तर अन्य दोन न्यायाधीश सध्या उपचार घेत आहेत.