रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 फेब्रुवारी 2020 (13:30 IST)

खासगी बसची पुणे-नाशिक हायवेवर ट्रॉलीला धडक; १० जखमी

पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटात उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव खासगी बसने गुरुवारी पहाटे जोराची धडक दिली. या अपघातात धुळे जिल्ह्यातील १० जण जखमी झाले आहे. धडक बसल्याने झालेल्या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले.
 
गुरुवारी पहाटे २ वाजता ट्रॅव्हल्स बस (एम. एच. १८ बीए ७८३०) पुणे येथून धुळे जिल्ह्यातील शहादा येथे प्रवाशी घेऊन निघाली होती. ही बस संगमनेरच्या पोखरी बाळेश्वरच्या हद्दीत आली असता महामार्गावरील उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकली. यामध्ये बसमधील चाकासह दहा प्रवाशी जखमी झाले. बसची पुढच्या बाजूची काच फुटली असून इतर ठिकाणी बसचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना उपचारासाठी संगमनेर शहरातील खाजगी बसची ट्रॉलीला धडक : १० जखमीखाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.