मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (10:30 IST)

'शरद पवार' सरकारचे मार्गदर्शक आहेत : मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे महाविकास आघाडीच्या सरकारचा रिमोट कंट्रोल नाही, ते सरकारचे मार्गदर्शक आहेत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीच्या तिसऱ्या भागामध्ये स्पष्ट केले आहे.
 
या सरकारचा ‘रिमोट कंट्रोल’ दुसऱ्या कोणाकडे आहे का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “रिमोट कंट्रोल वगैरे असा काही प्रश्न नाहीये. आम्ही तीन वेगळे पक्ष आहोत. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे. तुम्हाला शरद पवारांविषयी विचारायचं आहे का? तर शरद पवारसुद्धा रिमोट कंट्रोल म्हणून वागत नाहीत… त्यांच्या काही सूचना असतील तर त्या जरूर करतात” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 
“त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांच्या अनुभवाने ते मला नक्कीच मार्गदर्शन करतात. समजा काही विषय असला तर मीही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो” असे मुख्यमंत्री म्हणाले. महाविकास आघाडीचे भवितव्य चांगले आहे. पंतप्रधान मोदी व सोनिया गांधी यांना लवकरच दिल्लीत जाऊन भेटू असेही त्यांनी सांगितले.