एक तर्फी प्रेमातून तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
वर्ध्यात महाविद्यालयात शिक्षिक असलेल्या तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. हिंगणघाट येथे हा प्रकार घडला असून पीडित तरुणीची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपी विकी नगराळे याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात हा प्रकार घडला असून आरोपी विकी नगराळे याने सकाळी कामावर निघालेल्या तरुणीच्या चेहऱ्यावर पेट्रोल फेकून तिला पेटवून दिले आणि फरार झाला. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे पोलीस निरिक्षक सत्यवीर भांदिवर यांनी सांगितले.
या घटनेमध्ये पीडित तरुणीचा चेहरा पूर्णतः जळाला असून तिची वाचाही गेली आहे. तसेच तिच्यावर डोळे गमावण्याचीही वेळ आली आहे. तीन महिन्यांपूर्वीही देखील नगराळेने तिला बसमध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आली आहे.