सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बीड , सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (13:21 IST)

भाषण न करताच गेलो तर ब्रेकिंग न्यूज होईलः धनंजय मुंडे

'आज मी भाषण नाही केले तर यांची ब्रेकिंग न्यूज होईल', असे म्हणत दोनवेळा जाहीर कार्यक्रमांमधून भाषण न करताच निघून जाण्याची वेळ आलेल्या धनंजय मुंडेंनी तुफान फटकेबाजी केली आहे. राज्य कबड्डी स्पर्धेच्या उद्‌घाटनानंतर धनंजय मुंडेंनी जाहीर भाषण केले. 
 
मागच्या काही दिवसांमध्ये दोनवेळा जाहीर कार्यक्रमांमध्ये वेळेत न पोहोचल्याने मुंडे यांना भाषण न करता घरी परतावे लागले होते. त्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तारातून टीका होत होती. यावेळी त्यांनी आपण भाषण नाही केले तर यांची ब्रेकिंग न्यूज झाली होती. तसेच 'पवारांचा शिरस्ता मुंडे पाळणार का?' अशा आशयाची बातमी आली होती. बीडचे पालकमंत्रिपद आणि सामाजिक न्यायमंत्री झालेल्या धनंजय मुंडे यांच्याभोवती कायम कार्यकर्त्यांचा गराडा असतो. कुणी वैयक्कि तर कुणी सार्वजनिक कामासाठी त्यांच्या कार्यालयात तर कधी घरी सगळीकडे अगदी मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत असतात, असा अनुभव यापूर्वी दोन कार्यक्रमात आला होता. मात्र यातूनही वेळ काढून धनंजय मुंडे आपल्या जाहीर कार्यक्रमाचे टाइमिंग पाळणार आहेत का हा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर त्यांनी राज्य कबड्डी स्पर्धेच्या उद्‌घाटनानंतर भाषण केले.
 
अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये राज्य कबड्डी असोसिएशन आणि स्वर्गीय बालासाहेब लोमटे यांच्या स्मृती प्रचारार्थ ठेवलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. मैदानावर राज्यातील खेळाडूंना शुभेच्छा देत, या स्पर्धेसाठी धनंजय मुंडे यांनी दहा लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली.