बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (10:35 IST)

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांचा राजीनामा

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. सरकार बदलले म्हणून मी राजीनामा देणार नाही, अशी भूमिका विजया रहाटकर यांनी घेतली होती. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दादही मागितली होती. 
 
आयोगाचे अध्यक्षपद राजकीय स्वरूपाचे नसून त्याबाबत राज्य सरकारला कायद्यानुसारच विहीत प्रक्रिया करावी लागेल, असेच स्पष्ट झाले आहे. हे अतिशय महत्वाचे आहे. आयोगाचे अध्यक्षपद हे राजकीय स्वरूपाचे नसल्याचे सिद्ध झाले आहे. हा माझ्या अराजकीय भूमिकेचा नैतिक विजय आहे. त्यामुळे आता हे पद स्वतःहून सोडण्याचा निर्णय घेतला आहे आहे. आणि मी तसा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  सादर केला आहे, अशी प्रतिक्रिया रहाटकर यांनी दिली.