मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (10:33 IST)

पुन्हा तेच, किरकोळ घरगुती वादातून महिलेला घरात घुसून पेटविले

सिल्लोडच्या अंधारी गावातील एका महिलेला घरात घुसून पेटवण्यात आलं आहे. महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवण्यात आलं आहे. यामध्ये महिला 95 टक्के पेटली असून तिच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहे. 
 
किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. महिलेवर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच रॉकेल ओतलं आहे. किरकोळ वादातून राग अनावर झाल्यामुळे शेजारील व्यक्तीने महिलेवर रॉकेल ओतलं आहे. बिअर बार चालकाने हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार घडल्यानंतर आरोपीला तात्काळ परिसरातील व्यक्तींनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.