बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (11:30 IST)

मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात, पुलावरून 15 फूट उंचीवरून खाली कोसळली कार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेणजवळ उड्डाणपुलावरून कार खाली रस्त्यावर कोसळली आहे. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून यातील दोन जणांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
 
मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. कारचा वेग जास्त असल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. कल्याणवरून श्रीवर्धनकडे जाताना हा अपघात झाला. हॉटेल झी ग्रार्डनसमोर ब्रिजवरून कार (MH05EA 5576) 15 फूट उंचीवरून खाली पडली. घटनास्थळी असणाऱ्या लोकांनी तात्काळ जखमींना बाहेर काढलं आणि नजिकच्या पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर गंभीर जखमींना एम.जी.एम पनवेल येथे उपचारासाठी हलविण्यात आलं आहे.
 
संध्या नथू पाटील, राजेश शशिकांत मोरे आणि प्रीती दत्तू कडवे अशी जखमींची नावे आहेत.