ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद नोवाक जोकोविचने राखले

मेलबर्न| Last Modified सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (14:02 IST)
सर्बियाचा विख्यात टेनिसपटू नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलिन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत त्याने ऑस्ट्रिलायाच्या डॉमिनिक थिएमर 6-4, 4-6, 2-6, 6-3, 6-4 अशा पाच सेट्‌समध्ये विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जोकोविचचे हे आठवे विजेतेपद ठरले आहे. त्याचबरोबर गतविजेत जोकोविचने आपले जेतेपद स्वतःकडेच कायम राखले आहे.
जोकोविचने तीन तास व 59‍ मिनिटे चाललेल्या या सामन्यात विजय मिळवला. 32 वर्षीय जोकोविचचे हे 17 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले. रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदांशी बरोबरी करण्यासाठी त्याला केवळ 3 विजेतेपदांची गरज आहे. थिएमचा ग्रँडस्लॅमधला हा तिसरा अंतिम सामना होता व तिसर्‍यातही त्याल पराभवाचा सामना करावा लागला. तो यापूर्वी 2018 व 2019 मध्ये फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला होता व दोन्ही वेळेला त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तर जोकोविचने यापूर्वी 2008,2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019 मध्ये हा किताब जिंकला आहे.
अंतिम सामन्यात पहिला सेट जोकोविचने आपल्या नावाला साजेल अशा पध्दतीने खिशात घातला. त्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये थिएमने केलेला खेळ हा कौतुकास्पद होता. जोकोविचवर पूर्णपणे सरशी मिळवत थिएमने सलग दोन सेट जिंकत सामन्यात आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये जोकोविचने दमदार पुनरागन करत सामन्यात बरोबरी साधली. अखेरच्या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलीच झुंज रंगली होती. थिएमने आपल्या ठेवणीतल काही खास फटक्यांच्या जोरावर जोकोविचला चांगलेच सताविले. मात्र, सरतेशेवटी जोकोविचने आपला सर्व अनुभव पणाला लावत विजेतेपदावर आपली मोहर उमटवली.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य ...

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा ...

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे
रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ...

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही
कोविडपासून पसरणार्‍या व्हायरसपासून महाराष्ट्राला नक्कीच वाचवणार परंतू दुहीचा व्हायरस ...

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या ...