मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मेलबर्न , गुरूवार, 30 जानेवारी 2020 (15:45 IST)

नदालचा पराभव करत थिएम उपान्त्य फेरीत

ऑस्ट्रियाच्या डॉनिक थिएमने बुधवारी येथे जगातील क्रमांक एकचा खेळाडू राफेल नदालचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत मोठी उलथापालथ केली. त्याने दिग्गज नदालला धूळ चारून उपान्त्य फेरी गाठली आहे. आता त्याचा सामना अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेवशी होईल.
 
नदालने फ्रेंच ओपनच्या मागील दोन अंतिम फेरीतील सामन्यात पाचव्या मानांकित थिएमचा पराभव केला होता. त्या पराभवाचे उट्टे थिएमने मेलबर्नमध्ये काढले. त्याने स्पेनच्या दिग्गज खेळाडूचा 7-6 (7/3), 7-6 (7/4), 4-6, 7-6 (8/6) ने पराभव करत त्याच्या 20 व्या ग्रँडस्लॅमचा किताब जिंकण्याच्या आशेवर पाणी सोडले.
 
झ्वेरेव पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या उपान्त्य फेरीत
जर्मनीचा युवा खेळाडू अ‍ॅलेक्झांडर झ्वरेवने एका सेटच्या पिछाडीनंतर अनुभवी स्टॅन वावरिंकाला पराभूत करत पहिल्यांदा ग्रँडस्लॅमच उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.
 
सातव्या मानांकित झ्वेरेवने 2014 चा चॅम्पियन वावरिंकाला 1-6, 6-3, 6-4, 6-2 ने पराभूत केले. आता त्याचा सामना ऑस्ट्रियाचा पाचवा मानांकित डॉमिनिक थिएम याच्याशी होईल. 
 
झ्वेरेव ऑस्ट्रेलियन ओपनमधील आपल्या प्रत्येक विजयातील दहा हजार डॉलरची रक्कम ऑस्ट्रेलिातील आगपीडितांना देत आहे.