गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जानेवारी 2020 (13:54 IST)

फेडररची पहिल्या फेरीतील विजयाची परंपरा कायम

स्वीत्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर वीस वर्षांपूर्वी पदार्पणकेल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कधीही पहिल्या फेरीतून स्पर्धेबाहेर झाला नाही. या स्टार खेळाडूने सोमवारी आपली विजयाची परंपरा कायम ठेवली.
 
आपला 21 वा ग्रँडस्लॅम किताब जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या या 38 वर्षीय खेळाडूने स्टीव जॉन्सनचा 6-3, 6-2, 6-2 ने पराभव करत वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅममध्ये दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.
 
फेडररने टुर्नोंटपूर्वी सांगितले होते की, त्याला ऑस्ट्रेलियन ओपनमधून जास्त अपेक्षा नाहीत. कारण तो आपल्या परिवारासह वेळ घालविण्यासाठी एटीपी चषकात सहभागी झाला नव्हता. अशा पध्दतीने तो कोणत्याही सरावाविना मुकाबल्यासाठी उतरला होता. मात्र, त्याने अमेरिकेच्या खेळाडूविरूध्द खेळताना याची कमतरता भासू दिली नाही. त्याने पहिला सेट 6-3 ने जिंकला. त्यानंतर दुसराही सेट 6-2 ने आपल्या  
नावे केला.
 
सितसिपास दुसर्‍या फेरीत  
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेला खेळाडू स्टेफानोस सितसिपासने सोमवारी येथे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सालवाटोर कारूसोचा 6-0, 6-2, 6-3 असा पराभव करत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे.
 
या 21 वर्षीय खेळाडूकडून खूप अपेक्षा आहेत. कारण त्याने 2019 मध्ये रॉजर फेडररला पराभूत करून सर्वांना चकित करत अंतिम चारमध्ये प्रवेश केला होता. त्याने नंतर मार्सेली आणि एस्तोरिलमध्ये किताब जिंकला होता. तर लंडनमध्ये सत्राच्या शेवटी एटीपी फायनल्समध्ये प्रवेश केला होता. ज्यामुळे तो लेटन हेविटनंतर ही कामगिरी करणारा सर्वात युवा खेळाडू बनला होता. मात्र, सुरुवातीच्या ग्रँडस्लॅममध्ये तो मिश्र निकालांसह उतरला आहे. तो एटीपी चषकात डेनिस शापोवालोव आणि निक किर्गियोसकडून पराभूत झाला होता तर त्याने अ‍ॅलेक्झंडर ज्वेरेवर मात केली होती. 
 
सेरेना, ओसाका दुसर्‍या फेरीत सेरेना विलिम्सने 24 वा ग्रँडस्लॅम किताब जिंकणच्या आपल्या अपेक्षेसह ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस टुर्नामेंटमध्ये सोमवारी येथे दमदार सुरुवात केली तर गतवर्षीची चॅम्पियन नाओमी ओसाकानेही सरळ सेटमध्ये विजयासह दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.
 
सेरेनाने रशियाच्या एनस्तासिया पोटापोवाविरुध्द पहिला सेट 19 मिनिटांमध्ये जिंकला व नंतर फक्त 58 मिनिटांत 6-0, 6-3 ने सामना आपल्या नावे केला. ओसाकानेही झेक गणराज्याची मॅरी बोजकोवाला हिच्यावर 80 मिनिटांत 6-2, 6-4 ने मात केली.