सेरेनाचा तीन वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपला : बक्षिसाची रक्कम दिली आगपीडितांना
23 ग्रँडस्लॅम किताब जिंकलेल्या अमेरिकेच्या सेरेना विलिम्सने टुर्नामेंट जिंकल्यानंतर मिळालेली बक्षिसाची रक्कम ऑस्ट्रेलिातील जंगलांमध्ये लागलेल्या आगपीडितांना दान केली आहे. जी जवळजवळ 30 लाख रुपये इतकी आहे. सेरेनाने रविवारी डब्ल्यूटीए ऑकलंड क्लासिक फायनलमध्ये आपल्याच देशाची खेळाडू जेसिका पेगुलाचा पराभव करत किताब आपल्या नावे केला. सेरेनाने अशा पध्दतीने तीन वर्षांचा आपला जेतेपद प्राप्त करण्याचा दुष्काळही संपविला.
सेरेनाने या स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केल्याने या महिन्यात होणार्या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आशा वाढविल्या आहेत. या स्पर्धेत ती मार्गरेट कोर्टच्या 24 ग्रँडस्लॅम किताबाची बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. सेरेनाने पेगुलाचा लागोपाठच सेटमध्ये 6-3, 6-4 ने पराभव केला. 2017 मध्ये मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद जिंकल्यानंतर सेरेनाचे हे डब्ल्यूटीएचे व आई बनल्यानंतरचे पहिले जेतेपद ठरले आहे. या विजयामुळे तिला 30 लाख रुपयांचा धनादेश मिळाला जो तिने ऑस्ट्रेलियामध्ये आगपीडितांना सुरू असलेल्या मदतकार्यात दान केला. सेरेनाने कॅरोलिना वोज्निाकीसमवेत युगलच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता. मात्र, त्यांना अमेरिकेच्या आसिया मुहम्मद आणि टेलर टाउनसेंडविरूध्द 4-6, 4-6 असा पराभवाचा सामना करावा लागला.