रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: ऑकलंड , बुधवार, 8 जानेवारी 2020 (14:23 IST)

सेरेनाचा कॅमिलावर पहिला विजय

अमेरिकेची दिग्गज टेनिस खेळाडू सेरेना विलियम्सने मंगळवारी ऑकलंड डब्ल्यूटीए क्लासिक टेनिस टुर्नामेंटमध्ये इटलीच्या क्वॉलीफायर कॅमिला जार्जीचा सरळसेटमध्ये पराभव करून 2020 च्या सत्राची सुरूवात सकारात्मक केली.
 
या महिन्यात होणार्‍या ऑस्ट्रेलिया ओपनवर नजर ठेवलेल्या 38 वर्षीय अमेरिकेन खेळाडू सेरेनाने जागतिक क्रमवारीत 99 व्या स्थानी असलेल्या कॅमिलाला 6-3, 6-2 ने पराभूत केले. सेरेनाला सुरूवातीला दोनवेळची ग्रँडस्लॅम विजेता असलेल्या रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्सोवाविरूध्द खेळायचे होते. मात्र, आजारी असल्याच्या कारणामुळे विरोधी खेळाडू या स्पर्धेतून बाजूला झाली. यापूर्वी सेरेना विलियम्स आणि कॅरोलिन 
वोज्नियाकी जिने ऑकलंडमध्ये एएसबी क्लासिक टेनिस टुर्नामेंटच्या पहिल्या फेरीतील युगल सामन्यात   विजय नोंदवला होता. सेरेना आणि वोज्नियाकी यांनी जपानच्या नाओ हिबिनो आणि मिकोतो निनोमियावर 6-2, 6-4 ने मात केली. हा एक ऐतिहासिक सामना होता.