1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 28 जानेवारी 2020 (15:32 IST)

पद्म पुरस्कार यादीत नाव न आल्याने विनेश फोगाट नाराज

Vineesh Phogat
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. 2020 साली केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत बॉक्सर मेरी कोमला पद्मविभूषण तर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. मात्र, या यादीमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट हिचे नाव नसल्यामुळे तिने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
 
सरकारतर्फे दिले जाणारे पुरस्कार हे प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी असतात. मात्र, असे जाणवते की हे पुरस्कार तुमच्या सध्याच्या कामगिरीवर दिले जात नाहीत. प्रत्येकवेळी योग्य व्यक्तींना डावलले जाते. हा एक पॅटर्नच बनला आणि 2020 ची यादीही याला अपवाद नाही. पुरस्कार कोणाला मिळणार हे नेमके ठरवते तरी कोण? या शब्दांमध्ये विनेशने आपली नाराजी व्यक्त केली आहे.