शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 2 एप्रिल 2020 (16:55 IST)

मास्क लावला नसल्यामुळे गुन्हा दाखल, राज्यातील पहिलीच घटना

सोशल डिस्टंसिंगसह मास्क न लावणाऱ्यांवर नाशिक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मास्क न वापरल्याने नाशिकमध्ये अशाप्रकारचा हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलीस स्टेशन आवारात घडला आहे. तोंडाला मास्क न लावल्याने राज्यातील पहिला गुन्हा निफाड तालुक्यातील डोंगरगावचे पांडुरंग दत्तू आव्हाड या तरुणाविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. तसेच एका व्यक्तीमुळे इतरांना त्रास होईल अशी वर्तवणूक केल्यास आयपीसी १८८ कलम अंतर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे.