1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified सोमवार, 6 एप्रिल 2020 (22:57 IST)

मातोश्री परिसर सील

मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असून या परिसरात असलेल्या एका चहावाल्याला करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आला आहे.
 
एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीप्रमाणे मातोश्रीच्या गेट क्रमांक २ जवळ असलेल्या PWD च्या गेस्ट हाउसजवळ हा रुग्ण सापडला आहे. आता मातोश्रीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंगरक्षकांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
 
करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या वाढते आहे. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 868 वर पोहचली आहे.