शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 मार्च 2020 (22:03 IST)

नाम फाउंडेशनने करोनाशी लढण्यासाठी दिला १ कोटीचा निधी

करोनाशी लढण्यासाठी नामच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांच्यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपये पाठवणार आहोत असं नाना पाटेकर यांनी स्पष्ट केलं आहे. नाना पाटेकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.
 
नाना पाटेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लोकांना घराबाहेर पडू नका हीच सगळ्यात मोठी देशसेवा आहे या क्षणाला, एवढी मेहरबानी करा असे म्हटले. या क्षणाला आपण सगळ्यांनी जात, धर्म, पंथ विसरुन सरकारला सहकार्य करणं गरजेचं आहे असेही म्हटले. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून, पीएम आणि सीएम फंडासाठी प्रत्येकी ५० लाख पाठवणार आहोत अशी माहिती देखील दिली. 
 
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने यांनी उचलेलं हे पाऊल कौतुकास्पद असल्याचे म्हटले जात आहे.