1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मार्च 2020 (09:49 IST)

खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवू नयेत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

private doctors
खासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने बंद ठेवू नयेत, नियमित रुग्णांची गैरसोय करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून प्रवास करताना प्रवासी आढळले तर कारवाई केली जाईल. राज्यांच्या सीमा सध्या बंद असून महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यांतील नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.आज सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी वर्षा निवासस्थान येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील महत्त्वपूर्ण सूचना केल्या. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक  सुबोध कुमार जायस्वाल, पोलीस आयुक्त परमबीर सिंह, मनपा आयुक्त प्रवीण परदेशी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.