1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified सोमवार, 9 मार्च 2020 (13:34 IST)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

हार्दिक पांड्याचे पुनरागन
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 मार्चपासून सुरू होणार्‍या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 29 मार्चपासून सुरू होणार्‍या आयपीएलआधी भारतीय संघाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. 15 सदस्यीय संघात सुनील जोशी यांच्या निवड समितीने हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांना संधी दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक टी-20 स्पर्धेत हार्दिक पांड्याने फटकेबाजी केली होती. त्यातच रोहित शर्मा अजूनही दुखापतीधून सावरला नसल्यामुळे शिखर धवनला आणखी एक संधी देण्यात आलेली आहे. या मालिकेसाठीही विराट कोहलीकडेच भारतीय संघाचे नेतृत्व असणार आहे.
 
असा असेल भारताचा संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र
जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल.