गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (18:11 IST)

BCCI निवड समितीसाठी नवीन सदस्यांची निवड

BCCI निवड समितीच्या सदस्यांची निवड

बीसीसीआयच्या निवड समितीसाठी चार नावं निश्चित करण्यात आली आहेत. समितीचे माजी प्रमुख एम.एस.के. प्रसाद तसेच गगन खोडा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन अर्ज आले होते. 
 
क्रिकेट सल्लागार समिती या चारही उमेदवारांची मुलाखत घेणार आहे. या महिन्याच्या अखेरीस निवड समितीच्या नवीन प्रमुखांची निवड होण्याची बातमी आहे. आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी संघ निवडण्याची मोठी जबाबदारी या नवीन उमेदवाराच्या खांद्यावर असेल.
 
अनेक माजी खेळाडूंनी या पदासाठी अर्ज केले होते मात्र यापैकी चार नावं अंतिम करण्यात आली.
 
माजी फिरकीपटू, लक्ष्मण शिवरामकृष्णन, वेंकटेश प्रसाद, अजित आगरकर आणि राजेश चौहान या खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे.