शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मेलबर्न , शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (12:45 IST)

वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराचा घटस्फोट

michael clarke
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क आणि त्याची पत्नी कॅले यांनी घटस्फोट घेतला आहे. क्लार्क आणि कॅले यांनी मे 2012 मध्ये विवाह केला होता. दोघांनीही सहमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप विजेतपद मिळवून देणारा क्लार्क सात वर्षांच्या वैवाहिक बंधनातून वेगळा झाला आहे. 
 
क्लार्क आणि कॅली यांना चार वर्षांची एक मुलगी आहे. मुलीचे नाव कॅलसे असे आहे. घटस्फोटासंदर्भातील माहिती स्वतः क्लार्कने बुधवारी दिली. एकमेकांचा आदर करत हा निर्णय घेतला आहे. आमच्या दोघांसाठी चांगल्यासाठीच हा निर्णय घेतला, असे तो म्हणाला.