बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , बुधवार, 12 फेब्रुवारी 2020 (13:19 IST)

बायकोचा वाढदिवस... तिसर्‍यांदा मुख्यमंत्री... बजरंगबलीचा आशीर्वाद

मंगळवारी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच दिल्लीकरांच्या काळजाचा ठोका चुकला होता... प्रत्येकजण अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री व्हावेत म्हणून प्रार्थंना करीत होते... आणि शेवटी दोनच्या सुमारास चित्र स्पष्ट झाले नि मुख्यमंत्रिपदाची माळ तिसर्‍यांदा केजरीवालांच्या गळ्यात पडली आणि दिल्लीकरांनी सुटकेचा श्र्वास घेतला. 
 
यातच केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचा वाढदिवस असल्याने लेडी लकची विशेष चर्चा दिल्लीत रंगली होती... तर सीपीतील नवसाला पावणार्‍या बजरंगबलीचा आशीर्वादही केजरीवाल यांना लाभला असल्याने बुंदीच्या लाडवांचा प्रसाद हनुमंताला अर्णिं करुन दिल्लीकरांचे विशेष आभार मानले. केजरीवाल यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अविस्मरणीय भेट दिली असल्याचे सांगताना सुनीताताईंचा चेहरा आनंदाने चमत होता. प्रथमच दिल्लीकरांनी विकासकामांना मत दिले असल्याचा विशेष आनंद त्यांच्या चेहर्‍यावर जाणवत होता. गेल्या काही महिन्यापासून दिल्लीकरांना विजेचे बिल भरावे लागले नाही. तसेच सबंध दिल्लीत गुलाबी तिकीटामुळे निःशुल्क प्रवास महिलांना करायला मिळत होता. यामुळे केजरीवालांना दिल्लीकरांच्या हृदयात घर केले आहे. या छोट्या बाबी असल्या तरी याचा प्रभाव बचत स्वरूपात हातात उरत असल्यामुळे खरंच दिल्लीकर केजरीवाल यांच्यावर मनापासून खूश आहेत. त्यांना शाहीनबाग आणि हिंदू-मुस्लीम यापेक्षाही या बाबी महत्वाच्या वाटतात, हे या ऐतिहासिक विजयाने स्पष्ट झाले.
 
याशिवाय केजरीवालांचे साधे राहणीमान, त्यांचे सामान्य कुटुंब जिव्हाळचा विषय आहेच. एकूणच काय तर समाजम बदलायला सुरूवात झाली आहे. रोजच्या जीवनातील समस्या सोडविणारा नेताच जनतेला आपला वाटत असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले.