गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: वाराणसी , सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (13:07 IST)

रविदास जयंतीवरून मायावती प्रियंकावर भडकल्या

संत रविदास जयंतीला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी या वाराणसीत दाखल झाल्या. त्यांनी रविदास यांच्या जन्मस्थळाला भेट दिली. तसेच पूजा-आरती केली. तर प्रियंका गांधींची ही सर्व नौटंकी आहे, अशी सडकून टीका बहुजन समाज पक्षाच्या (बसप) नेत्या मायावतींनी केली आहे.
 
वाराणसीच्या बाबतपूर विमानतळावर प्रियंकाचे जोरदार स्वागत करण्यात आले. प्रियंका या विमानतळावरून थेट सीरगोवर्धन येथे संत रविदास जयंदी सोहळ्यासाठी रवाना झाल्या. वाराणसीत संत रविदास यांच्या जयंतीसाठी जाणार असल्याचे प्रियंका यांनी सोशल मीडियातून जाहीर केले. 
 
प्रियंका यांची ही भेट राजकीय नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रियंका या भेटीतून काँग्रेसची पाळेमुळे घट्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे राजकीय जाणकरांचे मत आहे. प्रियंका यांजी संत निरंजन दास यांचे आशीर्वाद गेत लंगर आणि प्रसादही ग्रहण केला. यापूर्वी 10 जानेवारीला प्रियंका गांधी वाराणसीतील राजघाट येथील संत रविदास मंदिरात दर्शन घेतले होते. तिथून त्या होडीने श्री मठात गेल्या. यानंतर काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते.
 
संत रविदास यांच्या स्तुतीचे काँग्रेसचे नाटकः मायावती
काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षाचे नेते संत रविदास मंदिरांमध्ये स्वार्थासाठी जातात. ही त्यांची नौटंकी आहे, अशी टीका बसपाच्या अध्यक्ष मायावतींनी केली. मायावतींनी ट्विट करत प्रियांकावरही निशाणा साधला. काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षांची उत्तर प्रदेशात सत्ता असल्यावर ते संत गुरू रविदास यांना कधीच मान-सन्मान देत नाही. पण सत्तेबाहेर असले की, त्यांचा स्वार्थ जागा होतो. मग ते मंदिरांना तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन नौटंकी करतात. यांच्यापासून सावध राहा, असे मायावती म्हणाल्या. बसपा एकमेव पक्ष ज्याने आपले सरकार असताना संत रविदास यांचा विविध स्तरावर सन्मान केला.