मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (12:01 IST)

चार महिन्यांचे मूल आंदोलनात जाते का? - सुप्रीम कोर्ट

शाहीनबागधील सीएए आंदोलनावरून सुप्रीम कोर्ट संतप्त
दिल्लीमधील शाहीनबाग येथे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) सुरु असलेल्या आंदोलनात चार महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाल्यावरून सवोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांचे मूल आंदोलनात जाऊ शकते का ? असा सवाल विचारला.
 
सर्वोच्च न्यायालयाने यावेळी शाहीनबागमध्ये आंदोलन करणार्‍या मुलांच्या मतांसाठी आपण न्यायालयात  आलो आहोत असे म्हणणार्‍या वकिलांनाही चांगलेच फटकारले. शाहीनबागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काही दिवसांपूर्वी थंडीमुळे एका चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता. यानंतर मुंबईतील राष्ट्रीय शौर्य पुरस्कारप्राप्त शाळकरी विद्यार्थिनी झेन सदावर्ते हिने सरनाधीश शरद बोबडे यांना पत्र लिहिले होते.