1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (10:43 IST)

तापमान नीचांक गाठणार असल्याचा अंदाज

The temperature is expected to reach a low
गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारा हवामानातील बदल पुढेही कायम राहणार आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशातील बहुतांश राज्यांमध्ये तापमान आणखी खाली जाणार असून शीतलहरीचा कहर अधिक तीव्र होताना दिसणार आहे. याचे थेट परिणाम महाराष्ट्र आणि मुंबईतही दिसणार आहेत. पंजाब, हरियाणा, चंदीगढ, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांमध्ये तापमान पुन्हा एकदा नीचांक गाठणार असल्याचा अंदाज वर्तवणत आला आहे.
 
फक्त शीतलहरीच नव्हे तर या भागांमध्ये धुक्याचे प्रमाणही वाढणार आहे. याशिवाय नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा अशा भागांमध्ये पर्जन्यमानही वर्तवण्यात आले आहे. तर ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या  किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये जोरदार वादळीवारंसह पावसाची शक्यता नोंदवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या वृत्तानुसार दिल्लीत पुन्हा एकदा पारा खाली जाणार आहे.
 
दिल्लीमध्ये येत्या काही दिवसांसाठी सकाळच्यावेळी मोठ्या प्रमाणात धुरके असेल. ज्याचा परिणाम  वाहतुकीवर होऊ शकतो. संध्याकाळचवेळी तापमानात लक्षणीय घट पाहायला मिळणार असल्यामुळे दिल्ली आणि पर्यायी संपूर्ण देश पुन्हा गारठणार हे खरे. उत्तर भारतात आलेली शीतलहर पाहता बहुतांश ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून प्रवासी आणि नागरिकांना सावधगिरीचा इशाराही देण्यात आला आहे. शिवाय संकटसमयी  आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रशासन यंत्रणांनीही पूर्णतयारी ठेवली आहे.