सोनिया गांधींना रुग्णालातून डिस्चार्ज, प्रकृतीत सुधारणा
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तब्येत बिघडल्याने रविवारी (2 फेब्रुवारी) रात्री 7 वाजता त्यांना दिल्लीमधील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अखेर त्यांना डिस्चार्ज मिळाला असून सध्या सोनिया यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
उपचारांनंतर सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचं म्हटलं जात आहे. सोनियांच्या प्रकृतीत आता बरीच सुधारणा झाली असून त्यांची तब्येत स्थिर आहे, असं रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं.