सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (13:30 IST)

कायद्यात 'लव्ह जिहाद'ची परिभाषाच नाही

सध्याच्या कायद्यात 'लव्ह जिहाद' सारखी काही टर्मच नाही. 'लव्ह जिहाद'ची परिभाषाच नाही आणि 'लव्ह जिहाद'शी संबंधित एकही प्रकरण सरकारपर्यंत आलेले नाही, असा खुलासा केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला. लोकसभेत एका लेखी प्रश्र्नाला उत्तर देताना रेड्डी यांनी हा खुलासा केला आहे.
 
लव्ह जिहादचे एकही प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांपर्यंत आलेले नाही, असे सांगतानाच एनआएने केरळमधील दोन वेगवेगळ्या धर्मांशी निगडित प्रकरणाचा तपास केल्याचेही रेड्डी यांनी सांगितले.